लढा करोनाशी! भारताने जर्मनीला दिली तब्बल १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणघातक करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. सरकार लवकरच देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही लवकरच चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी जर्मनीकडून १० लाख टेस्टींग किट मागवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

सध्या ‘प्रोब’ नावाची किट करोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी वापरली जात आहे, जी जर्मनीमधून येत आहे. सध्या देशात केवळ १ लाख टेस्टींग किट उपलब्ध आहेत. भारत सरकारने १० लाख अधिक चाचणी किट मागवल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चाचणीचा वेग आणि निदान करण्याची क्षमता वाढवण्यासाठी जर्मनीहून १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर दिली आहे.

त्याचबरोबर आयसीएमआर खासगी कंपन्यांकडून तयार होणार्‍या स्वदेशी किटचा पर्यायही घेत आहे. टेस्टींग किट बरोबरच चाचणीसाठी आणखी ९ प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. देशातील करोना व्हायरसशी संबंधित प्रकरणाची तपासणी क्षमता दिवसाला ६५०० पर्यंत पोहोचली आहे. लवकरच, देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी सुरू करण्याचे काम सुरू आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment