तबलिगी जमातच्या मौलाना सादसह इतर तबलिगींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलत तबलिगींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अंतर्गत हेतुपुरस्सर नसलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह १ हजार ८९० जणांवर हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या उत्सवामुळे. यामुळेच दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. या पूर्वी तबलिगींविरोधात साथीच्या आजारासंबंधीचा कायदा आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एवढंच नाही तर पोलिसांनी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १ हजार ८९० जणांना लुकआउट नोटीसही जारी केली आहे. परदेशातून आलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांनी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केले आणि निझामुद्दीनमधील मकरझच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला होता, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. निझामुद्दीन मरकझच्या इतर १८ लोकांनाही या तपासात सहभागी होण्याबाबत नोटीस जारी केली आहे. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी तबलीघी जमातीशी संबंधित दिड हजारांहून अधिक लोकांना पकडले आहेत. यांपैकी ४०० हून अधिक तबलीघी हे परदेशी आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

Leave a Comment