गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणं सुरू करण्यात आलं आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईतील ४६० रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील २१३ रुग्णांना बरं करून घरी पाठविण्यात आलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”