कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख चेक पोस्ट नाक्यांवर वाहनातील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच क्वारंटाईन नागरिकांनी दक्षता म्हणून किमान चौदा दिवस घरातून बाहेर पडू नये. असे आढळल्यास त्यांना सक्तीने आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ठेवले जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख चेक पोस्ट नाक्यांवर बाहेरगावाहून वाहनांमधून नागरिक येत असतात. आरोग्य विभाग, महसूल व पोलिस कर्मचार्यांमार्फत अशा वाहनांमधील प्रवाशांची चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. जर या वाहनांमध्ये कोणाला सर्दी, खोकला अथवा कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसतील त्यांना तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
परदेशातून येणार्या नागरिकांची यादी जिल्हाप्रशासकडे येतेच; पण त्यातूनही कोणी अनवधनाने राहिले तर त्यांनी स्वत:हून हॉस्पिटलमध्ये येऊन स्क्रीनिंग करून घ्यावे. अशा व्यक्तींनी स्क्रीनिंग केल्याशिवाय कोणत्याही अन्य व्यक्तीला भेटणे धोक्याचे ठरू शकते. सीपीआर व्यतिरिक्त शहरातील काही खासगी हॉस्पिटलमध्येही स्क्रीनिंगची सोय करण्यात आली आहे तेथे जाऊन अशा व्यक्तींची तत्काळ तपासणी केली जाईल.
सध्या जे काही असे लोक परदेशातून आले आहेत त्यांच्यावर प्रशासनाची विशेष नजर असणार आहे. जो कोणी फिरताना दिसेल त्याला उचलून नेले जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.होम क्वारंटाईन असणार्यांनी चौदा दिवस कोठेही बाहेर जाऊ नये. कारण रायपूरमध्ये एक संशयिताचा बाराव्या दिवशी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे या नागरिकांनी स्वत: बरोबरच कुटुंबाची काळजी करून बाहेर जाणे टाळावे अस आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा