कसलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार फक्त राज्यांवर दादागिरी करतंय!- जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनातून बरे होऊन नुकतेच घरी परतलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. मोदी सरकार कसलीही आर्थिक मदत न करता केवळ राज्यांवर दादागिरी करतंय, असा आरोप त्यांनी केला आहे. ”’कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारे करत आहेत. याउलट कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांवर दादागिरी करत आहे,”’ असा घणाघाती आरोप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आव्हाड यांनी मोदी सरकारवर केला आहे.

फेसबुकवर लिहलेल्या आपल्या पोस्ट ते पुढे म्हणतात, ”’पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करताहेत. पण प्रत्यक्षात लढाई राज्य सरकारं लढत आहेत. उलट सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून राज्य सरकारच्या कामकाजाला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात यशवंतरा चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं भक्कम जाळं निर्माण झाल्यामुळंच आज आपला संघर्ष सुरू आहे. मात्र, आज एक प्रकारचं आर्थिक अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघराज्य पद्धतीचा ढाचा खिळखिळा करून, संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा डाव दिसू लागला आहे,”असा थेट आरोप आव्हाड यांनी केला आहे.

Capture123

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाकडं पाहण्याचा उच्चभ्रूंचा दृष्टिकोन तुच्छतेचा आहे. पण याच उच्चभ्रूंच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पहारा देणारे आणि सर्व नियम पाळून चाचण्या घेणारे सुरक्षा रक्षक हे सुद्धा देशाच्या इतर प्रांतातून आलेले स्थलांतरित आहेत, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडलेला आहे, असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”