राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून हरियाणा सरकार आपल्या मर्जीतल्या लोकांना नोकरी मिळवून देत आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. भरती झालेल्या लोकांच्या गुणांची तपासणी करून त्यांचा निकाल सर्वाना बघण्यासाठी खुला केला पाहिजे असे सुरजेवाला म्हणाले आहेत.
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक
हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सरकार मध्ये नोकरभरतीत घोटाळे होत आहे. रोज नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना याचा फटका बसत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.
राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार
हरियाणाच्या युवकांचे भविष्य अंधारात आहे. भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.