हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या काळात सर्व देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. HDFC बँकेने बेस रेट हा 0.55 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आणला आहे. 11 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या घोषणेनंतर आता बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होईल. बेस रेट हा असा दर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. हा कर्जाचा किमान व्याज दर मानला जातो.
याआधी आज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने प्रमुख कर्ज़ मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा 0.05 टक्क्यांनी कमी केलेला आहे. ही कपात सर्व मुदतीच्या कर्जासाठी केली गेली आहे. हे नवीन दर मंगळवार, 15 सप्टेंबरपासून लागू झाले. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी एक वर्ष मुदतीच्या कर्जासाठीचा MCLR हा 7.15 टक्क्यांवरून 7.10 टक्के केला आहे.
त्याचप्रमाणे एक दिवस आणि एका महिन्याच्या कर्जासाठीचा MCLR कमी होऊन 6.55 टक्क्यांवर आला आहे, जो यापूर्वी 6.60 टक्के होता. बँकेने तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जावरील MCLR देखील कमी केलेला आहे. या कालावधीसाठी कर्जाचे दर अनुक्रमे 6.85 आणि 7 टक्के असतील.
बेस रेट म्हणजे काय, बँकेने ते का बदलले- बेस रेट ही संकल्पना सन 2010 मध्ये सुरू करण्यात आली होती, जेणेकरुन बँका केवळ कॉर्पोरेट लोकांनाच नव्हे तर किरकोळ कर्जदारांना स्वस्त कर्ज देतील. बबेस रेट हा असा दर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. कर्जाचा हा किमान व्याज दर मानला जातो.
परंतु बँकांनी या दरांबाबत छेडछाड सुरू केली होती. सन 2015 मध्ये RBI ने MCLR सुरू केला, त्या अंतर्गत कर्जाची रक्कम आणि कालावधीनुसार बँका वेगवेगळ्या दराने कर्ज देऊ शकतात. यानुसार व्याज दर निश्चित मुदतीसाठी निश्चित केला जाईल आणि त्यातील बदल नंतर शक्य होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.