चीनमधून मधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा; आयसीएमआरची राज्यांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनमधून आयात केलेल्या राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २ दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआर(Indian council of medical research)चे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून हॉटस्पॉट भागांमध्ये ७५ हजारांवर अधिक रॅपिड टेस्ट करण्यात येणार होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आयसीएमआकडून विविध राज्यांना ५ लाखांहून रॅपिड टेस्टिंग किट देण्यात आले. हे रॅपिड टेस्टिंग किट भारताने चीनमधून आयत केले आहेत. भारतात १५ एप्रिलला ते दाखल झाले. यानंतर आयसीएमआरकडून ते विविध राज्यांना पाठवण्यात आले. हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये या रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग करण्यात येत होता. रॅपिड टेस्टिंग किटचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याची राजस्थान सरकारने तक्रारी आयसीएमआरकडे केली होती.

दरम्यान, रॅपिड टेस्टिंग किट बाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळं आम्ही आणखी ३ राज्यांकडून माहिती घेतली. पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या संस्थेच्या ८ केंद्रांमधील प्रतिनिधींना रॅपिड टेस्ट किटची प्रत्यक्ष तापसणी करण्यासाठी पाठवणार आहोत. यातून त्या किट्स पडताळणी केली जाईल. ते योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही हे बघितले जाईल. कारण हे लॅबमध्ये बघता येणार नाही. तसंच पुढचे २ दिवस कुठल्याही राज्यांनी रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग करू नये. तपासणीत रॅपिड टेस्टिंग किट्स फक्त काही बॅचेस सदोष आढळून आली तर ती संबंधित कंपनीकडून बदलून घेतली जातील. दोन दिवसांत आमच्या तपासणी जे काही आढळून येईल याची माहिती दिली जाईल आणि त्यासंबंधी नव्याने दिशानिर्देश दिले जातील, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”. 

 

Leave a Comment