कोरोनाच्या संकटात भारताला गुगलच्या CEOने केली तब्बल इतक्या कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, उद्योजक, क्रिकेटपटूंनी काही कोटींमध्ये मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत गिव्ह इंडियाला ५ कोटी रुपये दान केले आहेत. गिव्ह इंडियाने यासंदर्भात ट्वीट केले आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात संकटात अडकलेल्या मजूरांच्या कुटुंबियांसाठी रोख रक्कम म्हणून गुगलकडून पाच कोटी रुपये देण्यासाठी सुंदर पिचाई तुमचे धन्यवाद!

सुंदर पिचाई यांच्याकडून ही मदत देण्याआधी गुगलने करोनाग्रस्तांसाठी ८० कोटी डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली होती. यात स्वयंसेवी संस्था आणि बँकांसाठी २० कोटी डॉलर देण्याचा समावेश होता. यामुळे छोट्या उद्योजकांना आर्थिक मदत केली जाईल.

The rise and rise of Sundar Pichai: From C grade at IIT Kharagpur ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment