मुंबईतून सर्व निर्बंध कधी हटवले जातील आणि संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण कधी केले जाईल त्याबाबत BMC म्हणाली कि …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना विषाणूची तिसरी लाट पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) चांगलीच तयारी केली आहे आणि ते अंमलात आणण्यास सुरुवात देखील केली आहे. BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी सांगितले की,” तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन टास्क फोर्सला सतर्क करण्यात आले आहे.” यासह, त्यांनी सांगितले की,”आतापर्यंत मुंबईतील 21 लाख रहिवाशांना कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत आणि 12 ऑगस्टपासून लोकल ट्रेनसाठी ऑनलाइन पासची सुविधा देखील सुरू झाली आहे.”

BMC आयुक्त म्हणाले, “18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंटमध्ये जाण्याची परवानगी असेल. रिटेल आउटलेट उघडण्यासाठी, तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक आहे.”

इक्बाल सिंग यांनी लसीकरणात खाजगी क्षेत्राच्या योगदानाची प्रशंसा केली. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण कधी होईल? यावर ते म्हणाले की,”दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबई 100% लसीकरण पार पडेल.” ते पुढे म्हणाले कि,”नोव्हेंबर अखेरीस संपूर्ण मुंबई उघडली जाईल. जर संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण झाले तर मुंबईतील सर्व निर्बंध उठवले जातील.”

Leave a Comment