नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूप वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाने 7.9 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आतापर्यंत देशात 16,38,464 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नवीन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मागील 24 तासात एक लाख तीन हजार 558 नवे करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही संख्या चिंता वाढवणारी आहे. तसेच देशात मागील 24 तासात 52 हजार 847 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे मागील 24 तासात तब्बल 478 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आतापर्यंत देशात करोना बधितांची एकूण संख्या 1,25,89,067 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1,16,82,136 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात साध्या 7,41,830 रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 1,65,101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 7,91,05,163 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.देशात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे, तसेच 45 वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या, व्याधीग्रस्त व्यक्तींना लसीकरण केले जात आहे.