दिलासादायक! देशात २०,९१७ रुग्ण करोनामधून बरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताच आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येनं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. मात्र, देशभरातील आरोग्य यंत्रणांच्याच प्रयत्नानं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.

देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २० हजार ९१७ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. तर मागच्या २४ तासात १ हजार ५५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मागच्या २४ तासात सोमवार सकाळपर्यंत देशभरात करोनाचे नवे ४ हजार २१३ रुग्ण सापडले व ९७ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आता करोना व्हायरसचे ६७,१५२ रुग्ण असून २,२०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांमध्ये लक्षणे असतील तर त्यांना स्वत:हून समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment