हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम सिब्लीने मँचेस्टरच्या कठीण खेळपट्टीवर 465 मिनिटे फलंदाजी करताण आपले शतक पूर्ण केले जे कोणत्याही कसोटी क्रिकेटपटूसाठी एक आश्चर्यकारक अशी कामगिरी आहे. डोम सिब्लीच्या या संथ शतकाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेउयात.
आपल्या शतकी खेळीत डोम सिब्लीने केवळ चारच चौकार ठोकले. या आधी शतकादरम्यान चार चौकारांपेक्षा कमी चौकार ग्रॅहम थॉर्पेने 2000 मध्ये पाकिस्तानविरुद्ध धावा ठोकले होते. त्यावेळी आपल्या शतकी डावात थॉर्पेने केवळ एकच चौकार ठोकला होता.
डोम सिब्लीने 312 चेंडूत शतक पूर्ण केले आणि इंग्लंडने गेल्या 20 वर्षातील हे सर्वात संथ शतक आहे. डोम सिब्लीपूर्वी इंग्लंडचे दोन माजी कर्णधार नासिर हुसेन आणि मायकेल आर्थरटन यांनी 300 चेंडूत शतके ठोकली आहेत.
डोम सिब्लीचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका दौर्यावर 269 चेंडूत शतक ठोकले होते. सिब्ली हा आपला 8 वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्याचा हा डाव इंग्लंडसाठी त्याचे उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगत आहे.
इंग्लंडचा सिब्ली हा पाचवा असा फलंदाज आहे ज्याने 25 वर्षांचा होण्यापूर्वीच दोन कसोटी शतके ठोकली आहेत. अॅलिस्टर कुक, लिओनार्थ हटन, माईक आर्थरटन , जेफ्री बॉयकोट यांनी त्यांच्या आधी असा पराक्रम केलेला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.