जेव्हा द्रविडने पाकिस्तानी खेळाडूला विचारले,’मी आऊट होतो का ? उत्तर मिळाले,”नाही”, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना असतो तेव्हा रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. यावेळी, कोणत्याही संघाला सामना गमवायचा नसतो. आज दोन्हीही संघ एकमेकांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत पण एक काळ असा होता की, भारत देखील पाकिस्तानला जायचा. १९९६ साली झालेल्या एका सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक वक्तव्य केले आहे. राहुल द्रविड त्या सामन्यात बाद नसतानाही त्याला पॅव्हेलियनमध्ये कसे परत जावे लागले याबद्दल सांगितले. लतीफने मॅचनंतर स्वत: द्रविडला तो आऊट नसल्याचे सांगितले.

लतीफने द्रविडला सांगितले की तो आऊट नाही
शारजाह येथे झालेल्या एका एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले होते. राहुल द्रविड त्यावेळी क्रीजवर फलंदाजीला आला होता, हा त्यांचा तिसराच वनडे सामना होता. त्याने तीनच धावा केल्या होत्या तेव्हा मुश्ताक अहमदकडून एक जोरदार अपील करण्यात आले आणि पंचानी द्रविडला बाद घोषित केले. या सामन्याबद्दल बोलताना लतीफ म्हणाला, ‘ हा सामना शारजाह येथे भारताविरुद्ध खेळला जात होता. द्रविड विकेटच्या मागे झेलबाद झाला, मुश्ताक अहमदने बॉल टाकून जोरदार अपील केले, आम्हीसुद्धा त्याच्याबरोबर अपील केले आणि अंपायरने त्याला आऊट दिले. हा सामना संपल्यानंतर द्रविडने मला विचारले की,’ मी आऊट होतो का ? मी त्याला म्हणालो, ‘ भाई नाही, मुश्ताक नंतर खूप पिडतो. ‘ आमिर सोहेलच्या नेतृत्वात खेळलेला हा सामना पाकिस्तानने ३८ धावांनी जिंकला होता.

लतीफने द्रविडची जोरदार प्रशंसा केली
रशीद लतीफने द्रविडचे कौतुक केले आणि सांगितले की,’ असा खेळाडू फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला होता. तो म्हणाला की,’ द्रविड अंडर १९ आणि इंडिया अ चा प्रशिक्षक असताना भारताला अनेक चांगले खेळाडू दिले आणि त्यांना चांगले मार्गदर्शनही केले. यापूर्वी पाकिस्तानचा माजी फलंदाज युनिस खाननेही द्रविडचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की,’ द्रविडने त्याला मार्गदर्शन केले होते ज्यामुळे त्याचा खेळ सुधारला.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.