बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली कमगिरी केली. याचा फायदा महेदी हसनला झाला. आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे बॉलिंग टॉप 10 रँकिंगमध्ये भारताचा बॉलर जसप्रीत बुमराह याचा समावेश आहे. महेदी हसनने या आठवड्यात बुमराहला मागे टाकले आहे.

मेहदी हसनच्या अगोदर बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसन याने 2009 साली पहिल्या क्रमांकावर मजल मारली होती. यानंतर अब्दुल रज्जाक हा 2010 मध्ये टॉप 2 मध्ये पोहचला होता. यानंतर 11 वर्षांनी एखाद्या बांगलादेशी बॉलरने टॉप 2 पर्यंत मजल मारली आहे. मेहदी हसनला या आठवड्यात तीन अंकाचा फायदा झाला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये चार तर दुसऱ्या वन-डेमध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याने आपले स्थान कायम ठेवले आहे. ट्रेंट बोल्ट आणि मेहदी हसन यांच्यात फक्त 12 पॉईंट्सचे अंतर आहे.

आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री चौथ्या क्रमांकावर आहे. यामध्ये बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रेहमान याला 8 क्रमांकाचा फायदा होऊन त्याने टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. मुस्तफिजुरने श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही वन-डेमध्ये प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. मुस्तफिजुर रेहमान रँकिंगमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये भारताचा जसप्रीत बुमराचा समावेश आहे. तो पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये भारताच्या अन्य कोणत्याच बॉलरला टॉप 10 मध्ये स्थान मिळाले नाही. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा सहाव्या, इंग्लंडचा ख्रिस वोक्स सातव्या तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुज आठव्या क्रमांकावर आहे.