मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली होती. हि फायनल न्यूझीलंडने जिंकली होती. या फायनलनंतर आयसीसी लगेच दुसऱ्या सिझनच्या तयारीला लागली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजपासून दुसऱ्या सिझनला सुरुवात होणार आहे. या चॅम्पियनशिपच्यापूर्वी आयसीसीने पॉईंट सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत.
आगामी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्लो ओव्हर रेटचा मोठा फटका टीमना बसणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये एक टेस्ट जिंकल्यानंतर 12 पॉईंट्स, ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना 4-4 पॉईंट्स आणि टाय झाली तर दोन्ही टीमना प्रत्येकी 6-6 पॉईंट्स मिळणार आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये स्लो ओव्हर टाकणाऱ्या टीमला मोठा फटका बसणार आहे. प्रत्येक स्लो ओव्हरसाठी 1 पॉईंट कापण्यात येणार आहे. या ओव्हर्सची संख्या जास्त असेल तर टीमाना मोठा फटका बसणार आहे. यामुळे जास्त टेस्ट जिंकल्या तरी फायनलची संधी हुकण्याची शक्यता आहे. आता झालेल्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सीरिजच्या आधारावर पॉईंट्स मिळत होते.एका सीरिजमध्ये जास्तीत जास्त 120 पॉईंट्स मिळत होते. पाच टेस्टची सीरिज खेळणाऱ्या टीमला याचा मोठा फटका बसला होता. तर दोन टेस्ट खेळणाऱ्या टीमना मोठा फायदा झाला होता.
न्यूझीलंड खेळणार कमी टेस्ट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडची टीम आगामी स्पर्धेत कमी टेस्ट खेळणार आहे. तर इंग्लंडची टीम सर्वात जास्त 21 टेस्ट खेळणार आहे. भारत 19, ऑस्ट्रेलिया 18, पाकिस्तान14,न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका प्रत्येकी 14 टेस्ट खेळणार आहेत. तर बांगलादेशची टीम 12 टेस्ट खेळणार आहे. या स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक टीमला तीन मायदेशात आणि तीन टेस्ट सीरिज विदेशात खेळाव्या लागणार आहे. टीम इंडिया यंदा न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलदेश या देशांचा दौरा टीम इंडियाला करावा लागणार आहे.