Thursday, March 23, 2023

पहिले सीमेवरच्या कुरापती काढणे थांबवा; कपिल देवचा शोएब अख्तरला टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. या विषाणूमुळे, जगभरात कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेण्यावर बंदी घालण्यात आली होती,ज्यामुळे खेळ संघटनांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत,खेळातील मोठे स्टार्स कोरोनाविरूद्धच्या लढ्यास आर्थिक पाठबळ देत आहेत आणि चॅरिटी सामने खेळण्याच्या योजनांवर विचार करीत आहेत.याच संदर्भात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका घेण्याची कल्पना सुचविली होती,यावर कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी भारतीय खेळाडूंनी टीका केली. या प्रकरणात कपिलने पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केलेले आहे.

कपिल म्हणाला की तो अजूनही शोएब अख्तरच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिकेच्या प्रस्तावाच्या बाजूने नाही. ते म्हणाले की, जर पाकिस्तान भारताबरोबर मालिका खेळण्याबद्दल इतका उतावीळ असेल तर त्याने प्रथम सीमेपलीकडून होणाऱ्या भारतविरोधी कारवाया थांबवाव्यात आणि त्यातुन जे पैसे वाचतील ते एका चांगल्या कार्यात वापरले पाहिजेत.

- Advertisement -

कपिलने‘ स्पोर्ट्स तक’ या यूट्यूब चॅनलला सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जावा या भावनेत आपण वाहू शकता.पण यावेळी क्रिकेट खेळणे हे प्राधान्य नाही आहे.आपल्याला पैसे हवे असतील तर सीमेपलीकडून होणाऱ्या भारतविरोधी गतिविधी थांबवा. “तो म्हणाला,” ते पैसे हॉस्पिटल आणि शाळांवर खर्च करा. जर आपल्याला पैसेच हवे असतील तर आपल्याकडे बर्‍याच धार्मिक संस्था आहेत आणि यावेळी पुढे येणे त्यांचे कर्तव्य आहे. “

कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात कपिल देव क्रिकेटऐवजी शाळा आणि महाविद्यालयांना प्राधान्य देण्याविषयी बोलले. ते म्हणाले, कोरोनामधून बरे झाल्यानंतर शाळा व महाविद्यालये सुरू करणे हे तरुण पिढीसाठी प्राधान्य असले पाहिजे आणि खेळाला पुन्हा सुरुवात करणे हे काही काळ टाळता येऊ शकते.

ते म्हणाले, “मी मोठे चित्र पहात आहे. तुम्हाला वाटते की क्रिकेटवर आत्ता बोलणे बाकी आहे. मला शाळा व महाविद्यालयात जाण्यास असमर्थ असलेल्या मुलांबद्दल काळजी वाटते. पहिले शाळा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे क्रिकेट आणि फुटबॉल नंतर सुरूच राहील. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.