१ मिनिट श्वास रोखता येत असेल तर तुम्हाला कोरोना नाही; रामदेव बाबांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्या देशात कोरोनानाने थैमान घातलं आहे. सगळीकडे चिंतेच वातावरण आहे. अशा वेळी कोरोना संबधी अजब दावे सध्या ऐकायला मिळत आहेत. असाच एक दावा योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा रामदेव यांनी शनिवारी केला आहे. “कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असले तर याचा अर्थ त्या व्यक्तीला करोना व्हायरसची बाधा झालेली नाही.” असा दावा रामदेव बाबांनी ई-अजेंडा आज तकच्या विशेष सत्रामध्ये बोलताना केला. ”कोरोना व्हायरससाठी विशेष प्राणायाम असून त्याला उज्जायी म्हटले होते’ असे बाबा रामदेव यांनी सांगितले. त्यांनी तो प्राणायामचा प्रकार करुनही दाखवला. उज्जायी प्राणायाम करुन बघणे ही करोना व्हायरसची एकप्रकारे सेल्फ टेस्टिंग असल्याचे त्यांनी सांगितले.

“ज्या व्यक्तींना हायपरटेंशन, ह्दयाचा आजार, डायबिटीस आहे त्यांनी ३० सेकंदासाठी आणि तरुणांनी एक मिनिटासाठी श्वास रोखून धरला तर याचा अर्थ तुम्हाला करोना व्हायरसची लागण झालेली नाही. तुम्ही हा प्रयोग करुन बघू शकता” असे बाबा रामदेव म्हणाले. इतकेच नव्हे तर रामदेव बाबांनी आणखी एक रामबाण उपाय सांगितला. त्यानुसार जर तुम्ही राईचे तेल तुमच्या नाकपुडयांमध्ये टाकले तर कोरोना व्हायरस वाहून खाली तुमच्या पोटामध्ये जाईल. तिथे असणाऱ्या अ‍ॅसिडमुळे त्याचा मृत्यू होईल” असाही दावा रामदेव बाबा यांनी केला.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात मोठी जीवित, वित्तहानी होत आहे. या महामारीपासून जगाला वाचवण्यासाठी असंख्य संशोधक अहोरात्र काम करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं एकमेव उपाय म्हणजे लस. मात्र, अजूनही लस शोधून काढण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही आहे. अनेक विकसित देश कोरोनावर लस शोधण्याचं एकच लक्ष आपल्या डोळ्यांसमोर ठेवून कमला लागले आहेत. दरम्यान, भारतात शनिवार सकाळपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. तर ५ हजार ०६२ रुग्ण कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत तर ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment