आयपीएल रद्द होताच ‘या’ अँकरने चक्क नवऱ्यालाच लावले कामाला

Priti Dahiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बीसीसीआयने हि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हि स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत.

आयपीएल स्पर्धेत खेळाडूंसोबत पत्रकार आणि अँकर यांचेदेखील महत्वाचे काम असते. या स्पर्धेदरम्यान यांचेदेखील व्यस्त वेळापत्रक असते. आयपीएलचे सामने कव्हर करताना त्यांची चांगलीच दमछाक होते. कधी कधी त्यांना एकाच दिवसामध्ये दोन मॅच देखील कव्हर कराव्या लागतात. आता आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने या लोकांना देखील निवांतपणा मिळाला आहे.

स्पोर्ट्स अँकर प्रिती दहिया हि आयपीएलचे सामने कव्हर करत असते. ती उत्तम प्रकारे आयपीएलचे सगळे सामने कव्हर करत असते. आता हि आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने ती आपल्या नवऱ्यसोबत टाइम घालवत आहे. असाच नवऱ्यासोबतचा तिने एक फोटो शेअर ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये प्रिती यांचे पती सीजी अय्यप्पा हे प्रिती यांच्या केसाला तेल लावताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना प्रिती दहिया यांनी त्या फोटोला ‘आयपीएल रद्द झाली, बायकोची सेवा कर’ अशा प्रकारचे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.