हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरात सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन बंद झालेले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरातच बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.यावेळी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन जे आता आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळत आहेत,त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे लाईव्ह चॅटद्वारे एकमेकांशी संवाद साधला. ज्यामध्ये विल्यमसनने सांगितले की तो आयपीएल कसा मिस करत आहे.
आयपीएलबद्दल विल्यमसनने वॉर्नरशी गप्पा मारताना सांगितले की, “नि: संशय ही जगातील सर्वात मोठी टी -२० लीग आहे. भारतीय चाहते आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळणे छान झाले आहे. बरेच खेळाडू चांगले मित्रही बनले आहेत. त्यामुळे सर्वांप्रमाणेच मीसुद्धा लीगला मिस करत आहे. ”
इतकेच नव्हे, तर वॉर्नरने आयसीसी विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यांच्या आठवणी परत जाग्या केल्या,तो सामना आणि सुपर ओव्हरही टाय झाल्यानंतर न्यूझीलंडला अधिक चौकार मारणाच्या नियमांच्या आधारे पराभवाला सामोरे जावे लागले.ज्याबद्दल विल्यमसन म्हणाला, “काही गोष्टी तुमच्या हातात नसतात.” कधीकधी आपण चांगली कामगिरी करतो पण तरीही अपेक्षित निकाल मिळत नाही,त्यावेळी या सामन्यानंतर आम्ही थोडे निराश झालो होतो पण संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यातही आम्ही कसे खेळलो याचा आम्हाला अभिमानही वाटतो. ”
कोरोना साथीच्या कारणामुळे २९ मार्चपासून सुरू होणारे आयपीएल यापूर्वी १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केले. मात्र, वर्षाच्या अखेरीस हि स्पर्धा खेळविण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.