मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक बॉलर्सनी त्यांच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा ऑफ स्पिनर कुलदीप यादव याने काही दिवसांपूर्वी आपण धोनीला मिस करत असल्याचे म्हंटले होते. यावर आता दीपक चहरने देखील आपले मत व्यक्त केले आहे. दीपक चहर हा आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. माझी बॉलिंग महेंद्रसिंग धोनीमुळे सुधारली असली असल्याची कबुली दीपक चहरने काही दिवसांपूर्वी दिली होती.
काय म्हणाला दीपक चहर
“माही भाईच्या कॅप्टनसीमध्ये खेळणे हे माझे स्वप्न होते. मी त्याच्या कॅप्टनसीमध्ये खूप काही शिकलो आहे. त्याच्या मार्गदर्शामुळेच माझ्या खेळाचा स्तर उंचावला आहे. त्यांनी मला जबाबदारी घेण्यास शिकवले. मी ‘पॉवर प्ले’ मध्ये तीन ओव्हर्स टाकतो. टीमसाठी पहिली ओव्हर टाकणे एवढे सोपे नाही. मी यामध्ये सुधारणा केली आहे. त्याचबरोबर विशेषत: टी20 क्रिकेटमध्ये रन कसे रोखले पाहिजेत हे देखील शिकलो आहे.” असे मत दीपक चहरने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आताच्या आयपीएलमध्ये दीपक चहरने ‘पॉवर प्ले’मध्ये चांगली बॉलिंग केली होती. या कामगिरीचे श्रेयसुद्धा दीपक चहरने धोनीला दिले आहे. ” तू ‘पॉवर प्ले’ बॉलर आहेस, असं धोनी मला नेहमी सांगतो. धोनीला त्याच्या खेळाडूंची चांगली माहिती आहे. धोनी आपल्या खेळाडूंचा मोठ्या हुशारीने वापर करतो. कोणता बॉलर ‘पॉवर प्ले’ मध्ये चांगला आहे,तर कोणता डेथ ओव्हर’मध्ये सरस आहे, याची त्याला चांगली कल्पना आहे असे दीपक चहरने स्पष्ट केले आहे.