हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चांगलीच चमकदार ठरली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत, त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीमधये एका डावात ४०० धावा करण्याचा आहे. मात्र आजवर कोणत्याही खेळाडूला लाराचा हा विक्रम मोडता आलेला नाही आहे. आपल्या काळात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या लाराबाबत पाकिस्तानचा एका गोलंदाजाने असे म्हंटले आहे की,’ लारा त्याच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करत असे.’
होय, हा गोलंदाज दुसरा कोणीही नसून पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिज आहे. हाफिजने पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “डावखुरा फलंदाज असलेल्या ब्रायन लाराला माझा सामना करणे नेहमीच अवघड गेले आहे. मी नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसमोर नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे तसेच मी माझा आवडता फलंदाज असलेल्या लाराला बादही केलेले आहे.
हफीझ पुढे म्हणाला की, “लारानेही हे कबूल केले की माझ्याविरुद्ध फलंदाजी करताना त्याला त्रास होत होता. लारा हा एक फर्स्ट क्लास फलंदाज आहे आणि तो स्पिनर्सला सहसा चांगला खेळत असे. ” एकदिवसीय क्रिकेटमध्ये हफीझने दोन वेळा ब्रायन लाराला बादही केलेले आहे.
तसेच हफीझ म्हणाला, “माझ्या कारकीर्दीत माझ्या गोलंदाजीने मला खूप आधार दिला. जर एखाद्या सामन्यात मला चांगली फलंदाजी करता आली नाही तर मी चांगली गोलंदाजी करून हि कसर भरून काढत असे. जोपर्यंत मी क्रिकेट खेळत आहे तोपर्यंत डावखुऱ्या खेळाडूंविरूद्धचे माझे हे यश मी कायम ठेवू इच्छित आहे. कारण मला हे गॉड गिफ़्टेड आहे. ”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.