हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला गेलेला भारत-पाकिस्तान कसोटी सामना अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा कसोटी सामना भारतीय संघासाठी अनेक प्रकारे विशेष आहे. या कसोटी सामन्यात भारताचा दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेने एका डावात १० विकेट घेण्याचा विक्रम रचला होता. असे करणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज तर जगातील दुसरा गोलंदाज ठरला. आजवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कुंबळेचा हा विक्रम मोडता आलेला नाही. कुंबळेच्याआधी असा पराक्रम १९५६ मध्ये इंग्लंडच्या जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.
या कसोटी सामन्याच्या वेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा होता. अक्रमने आकाश चोप्रासोबत झालेल्या एका व्हिडिओ चॅटमध्ये या कसोटी सामन्याबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आणि सांगितले की,” जेव्हा कुंबळेने ९ बळी घेतले होते तेव्हा आमच्या टिमकडे त्याला १० बळी घेण्याच्या विक्रमापासून रोखण्यासाठी काहीच योजना नव्हती.”
मात्र, पाकिस्तानचा कर्णधार अक्रमवर असा आरोप केला जातो की, त्याला कुंबळेला तो रेकॉर्ड करू द्यायचा नव्हता आणि म्हणून त्याने त्या सामन्यात आपल्या सहकारी फलंदाजाला कुंबळेऐवजी दुसर्या कोणत्याही गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होण्याची विनंती केली होती, जेणेकरून तो पूर्ण १० विकेटस घेऊ शकला नसता. मात्र आकाश चोप्राशी झालेल्या या चॅटमध्ये अक्रमने या आरोपाचा पूर्णपणे इन्कार केला आहे. वास्तविक दिल्लीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा दुसरा कसोटी सामना खेळला जात होता. दुसर्या डावात भारताने पाकिस्तानसाठी ४२० धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानी संघाने पहिला कसोटी सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घ्यायची होती.
सलामीवीर फलंदाज शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला जोरदार सुरुवात करुन दिलेली होती. एकही विकेट न गमावता पाकिस्तान १०१ धावा करुन चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत होते, मात्र येथूनच मग अनिल कुंबळेने आपल्या फिरकीची जादू दाखवायला सुरूवात केली.
कुंबळेने सर्वाधिक ४१ धावांची खेळी करणाऱ्या आफ्रिदीला पहिले पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इजाज अहमदला खातेही न उघडता परतीचा मार्ग दाखविण्यात आला. काही षटकांनंतर इंझमाम उल हकही कुंबळेचा शिकार ठरला. यानंतर ठराविक अंतराने पाकिस्तानी संघाच्या विकेट पडण्यास सुरुवात झाली.
अशाप्रकारे, पाकिस्तानी संघाने २०० धावाही गाठल्या नसताना नऊ गडी गमावले होते. भारतीय संघाला आता जिंकण्यासाठी फक्त एका बळीची गरज होती. त्याचवेळी कुंबळेला रेकॉर्ड बनविण्यापासून रोखण्याची कोणतीही योजना आपण आखली नव्हती, असेही अक्रमने सांगितले.
आकाश चोप्राशी बोलताना अक्रम म्हणाला, “नाही, कुंबळेला रेकॉर्ड बनविण्यापासून रोखण्यासाठी मी दुसर्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होऊ, हे खेळ भावनेच्याविरूद्ध होते.” मी त्या सामन्यात वकार युनूसला सांगितले की,” तू तुझा नैसर्गिक खेळ कर. मी अनिल कुंबळेच्या चेंडूवर बाद होणार नाही. कर्णधार म्हणून मी युनुसला सांगितले की,” तू कुंबळेला डिफेन्स करत खेळ करू शकतो आणि आपण जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीवर धावा करू शकतो. पण झालं असं की कुंबळेच षटक संपण्यापूर्वीच मी आउट झालो होतो. भारत आणि कुंबळे या दोघांसाठी तो एक मोठा दिवस होता. ‘
या सामन्यात पाकिस्तानची संपूर्ण टीम २०७ धावांवर बाद झाली होती. कुंबळेने अक्रमच्या रूपात आपला १० वा विकेट घेतला. त्याने ६६ चेंडूत ३७ धावा केल्या आणि अशा प्रकारे भारताने २१२ धावांनी सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
कुंबळेने या सामन्यात इतिहास रचताना २६.३ षटकांत १० गडी बाद करून आपल्या नावावर एका मोठा विक्रम नोंदवला. या व्यतिरिक्त कुंबळेने पहिल्या डावातही ४ बळी मिळवले होते आणि या पूर्ण सामन्यात त्याने भारतीय संघासाठी एकूण १४ बळी घेतले.
भारताच्या या विजयात कुंबळे व्यतिरिक्त सलामीवीर फलंदाज सद्गोपन रमेशची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. रमेशने दोन्ही डावात भारताकडून अर्धशतक ठोकले होते. त्याने पहिल्या डावात ६० धावा तर दुसऱ्या डावात तो ९६ धावांवर बाद झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.