Babar Azam ने मोडला विराटचा ‘तो’ रेकॉड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Babar Azam And Virat Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानने काल रात्री झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयामध्ये कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने 103 रनची खेळी करत वन-डे कारकिर्दीमधील 17 वे शतक पूर्ण केले आहे. याबरोबर त्याने (Babar Azam) टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा एक रेकॉड मोडला आहे. मुलतानमध्ये झालेल्या या वन-डे मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पहिल्यांदा बॅटींग करत 305 रन केले होते. पाकिस्तानने हे लक्ष्य 4 बॉल राखून पूर्ण केले.

विराटचा रेकॉड मोडला
बाबरने (Babar Azam) या सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन म्हणून वन-डे क्रिकेटमध्ये 1000 रन पूर्ण केले. त्यानं ही कामगिरी 13 इनिंगमध्ये पूर्ण केली. वर्ल्ड क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वात जलद हजार रन करणारा बाबर हा पहिला कॅप्टन बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड विराटच्या नावावर होता. त्यानं कॅप्टन म्हणून 17 इनिंगमध्ये 1000 रन पूर्ण केले होते. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स (18), न्यूझीलंडचा केन विल्यमसन (19), इंग्लंडचा एलिस्टर कूक (20) यांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.

यावेळी बाबरने (Babar Azam) शतक पूर्ण करताच वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. बाबरचं हे सलग तिसऱ्या वन-डेमध्ये शतक आहे. यापूर्वी त्यानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन वन-डेमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानं यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्ध 2016 साली शतकांची हॅट्ट्रिक केली होती.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट