हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे, ज्यामुळे क्रीडा कार्यक्रम थांबले आहेत.या कठीण क्षणामध्ये सध्याचे आणि माजी खेळाडू क्रिकेटशी संबंधित असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणी चाहत्यांशी शेअर करत आहेत.या मालिकेत आता माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिन तेंडुलकरशी संबंधित एक रंजक घटना शेअर केली आहे.१९९८ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मणने मोठा खुलासा केला आहे, ज्यामध्ये सचिन पहिल्या डावात फक्त ४ धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर त्याने स्वतःला खोलीतच लॉक करून घेतले होते.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, “सचिन खरोखरच चेन्नई कसोटीसाठी सज्ज झाला होता. पहिल्या डावात तो फक्त ४ धावांवर बाद झाला. त्याने पहिला चौकार ठोकला आणि नंतर वॉर्नला मिडऑनवरून शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मार्क टेलरकडे झेल देऊन झेलबाद झाला. “
लक्ष्मण म्हणाला की सचिन इतका निराश झाला होता की त्याने स्वत: ला खोलीतच बंद केले आणि रडू लागला.तो म्हणाला,”मला आठवत आहे की सचिनने स्वत: ला फिजिओ रूममध्ये बंद केले होते आणि सुमारे एक तासानंतर तो बाहेर आला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा आम्हाला दिसले की त्याचे डोळे लाल आहेत. मला वाटले की तो बराच भावनिक झाला होता कारण तो ज्या पध्द्तीने आऊट झाला होता त्यामुळे तोच खूपच निराश झाला होता. “
लक्ष्मण पुढे म्हणाला, “सचिनने दुसऱ्या डावात धमाल केली.यावेळी त्याने लेग स्टंपच्या बाहेर बॉलिंग करणार्या शेन वॉर्नची चांगलीच धुलाई केली.वॉर्न क्रीजची खोली वापरत होता आणि जेव्हा त्याने हे केले तेव्हा तर सचिनने मिड-ऑफ आणि मिडऑनला मोठे फटके मारले.अशाप्रकारे सचिनने नाबाद १५५ धावांची खेळी केली. माझ्या दृष्टीने वॉर्न आणि सचिन यांच्यातील हा सर्वोत्कृष्ट सामना होता. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.