‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व, या 2 भावांच्या जोडीला मिळणार संधी!

team india
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचची सिरीज खेळणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या टीमचे नेतृत्व भारताचा सलामवीर शिखर धवन करणार आहे. तसेच या टीममध्ये हार्दिक पांड्या-कृणाल पांड्या व दीपक चहर – राहुल चहर या भावा भावांच्या जोडीचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

तसेच या सिरीजमधून आरसीबीचा ओपनर देवदत्त पडिक्कल आणि केकेआरचा ओपनर नितीश राणा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. तसेच राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती देखील श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दोघे इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्याने त्यांना माघारी यावे लागले आहे.फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याची इंग्लंड दौऱ्यावर निवड न झाल्याने तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार हे आता निश्चित झाले आहे. तसेच फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यास श्रेयस अय्यरचादेखील टीम इंडियामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅचची सीरिज होणार आहे. यामधील पहिली वन-डे मॅच 13 जुलैला, दुसरी 16 जुलैला आणि तिसरी 19 जुलैला होणार आहे. तर टी 20 मॅच 22 ते 27 जुलैच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीम 5 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आहे. लवकर या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे.