Sunday, May 28, 2023

भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर मराठमोळ्या सुर्यकुमार यादवने दिली ही प्रतिक्रिया ; म्हणाला की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून मुंबईकर सुर्यकुमार यादव ला प्रथमच संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखील या मालिकेत संधी दिलेली आहे.

या निवडीनंतर त्यानं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्या पिचवर बसलेला असून ‘स्वप्नात असल्यासारखं वाटत आहे,’ असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CLiYc2nA2gy/?utm_source=ig_web_copy_link

सुर्यकुमार यादव याने मागील 2-3 आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. सूर्यकुमार यादव एक परिपक्व फलंदाज असून त्याला खेळाचं अचूक ज्ञान आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिकेत या मुंबईकर खेळाडूला संधी मिळालेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’