धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर नेहमीच रोखठोक मते मांडत असतो त्यामुळं तो कायम चर्चेत असतो. काही अनोळखी व्यक्तींकडून मला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं त्यानं सांगितलं. यासंबंधी त्याने दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. चौकशी सुरू केली आहे, असं समजतं. गौतम गंभीर हा पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेला आहे. अलीकडेच दिल्लीतील प्रदूषणासंबंधी झालेल्या बैठकीत तो सहभागी झाला नव्हता, यावरून त्याच्यावर टीका झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या –

महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार

उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार

अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार