Video:”जिंदगी मौत ना बन जाए…” गाणं म्हणत पोलिसाचे लोकांना घरात बसण्याचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू केली. मात्र, तरीही बरेच लोक करोनाचे संकट अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेच जण लॉकडाऊनचे नियम डावलून घराबाहेर पडत आहेत. लाठीच्या प्रसादानेही लोक ऐकत नाही म्हटल्यावर आता काही पोलीस थेट गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात बसून राहण्याचं आवाहन करताना दिसून आले आहेत.

बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने चक्क माईक हातात घेत ‘सरफरोश’ चित्रपटातील ‘जिंदगी मौत ना बन जाए’ हे गाणं गात लोकांना घराबाहेर पडू असं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या पोलिसाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अजून समजू शकलं नाही आहे. संगीताद्वारे केलेलं आवाहन तरी लोक ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  चला तर पाहुयात हा व्हिडिओ..

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.