खड्ड्याने घेतला डॉक्टर असलेल्या भावी नववधूचा बळी
ज्या घराला वेध लागले होते सनईच्या सुरांचे त्या घरावर काळाने घाला घातला. भावी सुखी संसाराची स्वप्न पाहणारी घरातून बाहेर पडलेली भावी नववधू पुन्हा घरी परतलीच नाही. लग्नाची खरेदी करण्यासाठी डॉक्टर असलेली नेहा आलमगीर शेख आपल्या मामासोबत बाजारात गेली होती. परत येताना रस्त्यातील खड्ड्यात गाडी अडकून झालेल्या अपघातात नेहाचा जीव गेला.