हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रेमाला नकार दिला म्हणून मुलींसोबत अनेक प्रकार घडत असतात. एखादी मुलगी नाही म्हणाली तर तिला मारणे, तिची छेड काढणे असे प्रकार होत असतात. अमरावती जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. मुलीने प्रेमाला नकार दिला म्हणून मुलाने मुलीच्या श्रीमुखातच लगावून दिली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार करणाऱ्या युवकाचे नाव असीम आहे.
असीम आपल्या घरासमोर उभा होता. तेव्हा ही युवती त्याच्याच घरासमोरून जात असताना पाहून असीमने तिला अडवले. त्याच्या कॉलला प्रतिसाद न देण्याबद्दल विचारणा केली आणि शिवीगाळही केली. तिने पुन्हा कॉल न करण्याबाबत त्याला सुनावले. तिच्या या प्रतिसादानंतर त्याने तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या श्रीमुखात लगावली. शेजाऱ्यांनी मध्यस्थी केली असता त्यांच्यावरही हात उगारून पळून गेला.
असीम गेल्या काही दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आहे असा आरोप या युवतीने केला आहे. तो तिला सतत कॉल करत होता मात्र त्याच्या कॉलला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात असे वर्तन केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.