हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या महागाई वाढवून केंद्र सरकारकडून अन्याय केला जात असल्याने या विरोधात काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून निषेध नोंदविले जात आहेत. आज मुंबईत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सायकल रॅली काढून इंधन दरवाढ, महागाई, काळे कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले. या रॅलीबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका केली आहे. काँग्रेसची सायकल रॅली हि नौटंकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महागाईविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. आंदोलनातून केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून काढल्या जात असलेल्या सायकल रेलीबाबत भाजप नेते विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
Interacting with media 📍Rambhau Mhalgi Prabodhini, Uttan https://t.co/JrMvjuoeNw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 15, 2021
फडणवीस यांनी टीका करताना म्हंटल आहे कि, यापूर्वीही सांगितलं आहे कि पेट्रोलमध्ये एकूण तीस रुपये थेट राज्याला मिळतात. आणि केंद्राला जे पैसे मिळतात त्यातील बारा रुपये हे राज्यांनाच परत मिळतात. याचा खरा अभ्यास सुधीर मुनगुंटीवार यांना माहिती आहे. कारण ते अर्थमंत्री होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्व आकडेवारी मांडली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्याकडून काढली जात असलेली सायकल रॅली हि नौटंकी आहे.
गेल्या वर्षी पेट्रोल व डिझेलवर किती कर मिळाले आहे. हे पाहिले तर २४ हजार कोटी रुपये करापोटी मिळाले आहेत. आता हजार ते दीड हजार कोटी रुपये जर कमी केले तरी राज्यांना २४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, राज्य सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.