हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोनाची वाढती संख्या चिंताजनक बाब बनली आहे. अशातच ठाकरे सरकारनं राज्यात ‘ब्रेक द चेन’ हे ब्रीद घेऊन वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. याच भीतीतून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या अनेक जणांनी आता रेल्वे स्टेशन वर आपापल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वर मोठी गर्दी झाली आहे या गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस वर जमलेले अनेक प्रवासी विनातिकीट गावी जाण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच श्रमिक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरल्याने ही गर्दी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान मागील वर्षी कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यानंतर देखील अशा प्रकारे मोठी गर्दी उसळली होती. अशा गर्दीमुळे कोरोना फैलावण्याचा धोका आधीक वाढेल यात शंका नाही
राज्यातील लॉकडाऊन विषयी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्यापासून दुकान उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज, उद्या निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page