हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर आता त्याला अटक करणाऱ्या NCB चे प्रमुख समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. NCB चे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी याबाबत एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की “आम्ही लवकरच वानखेडेवरील चौकशीचा अहवाल सादर करू. तसेच त्याने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यामध्ये अनेक त्रुटी देखील आढळून आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.”
यासोबतच दक्षता पथकही भ्रष्टाचाराच्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच त्या अहवालातूनही सर्व काही समोर येईल, असेही ते म्हणाले. मात्र आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, ANI ने आपल्या सूत्रांचा हवाला देत म्हंटले की, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चुकीचा तपास केल्याप्रकरणी माजी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी सरकारकडून एका अधिकाऱ्याची नेमणूक देखील केली गेली आहे. समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी देखील सरकारने यापूर्वीच कारवाई केली आहे. Cruise Drugs Case
NCB ने शुक्रवारी आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात आर्यन खानशिवाय अन्य 19 आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
NCB कडून नुकतेच एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यात असे म्हटले गेले की, “टीप ऑफच्या आधारे, NCB-मुंबईने विक्रांत, इश्मीत, अरबाज, आर्यन आणि गोमित यांना आंतरराष्ट्रीय पोर्ट टर्मिनल, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे पकडले तर नुपूर, मोहक आणि मुनम यांना 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर पकडले. यावेळी आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींजवळ अमली पदार्थ आढळून आले.” Cruise Drugs Case
NCB ने पुढे सांगितले की, NCB-मुंबई कडून सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला गेला. यानंतर, 5 नोव्हेंबर 2021 रोजी, NCB ने समीर वानखेडेला या प्रकरणातून काढून टाकले. यानंतर पुढील तपासासाठी नवी दिल्ली NCB मुख्यालयाच्या वतीने DDG (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. SIT ने 11 नोव्हेंबर 2021 रोजी हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले. Cruise Drugs Case
हे पण वाचा :
Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या
RBI FD Rules : RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा
SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या
Post Office : सरकार ‘या’ छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवणार ???