स्वस्त कर्जासाठी ग्राहकांनी अवलंबली ‘ही’ पद्धत, याचा फायदा कसा घेता येईल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । RBI च्या कृपेमुळे देशातील कर्जाचे व्याजदर ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कर्जदारांसोबतच होम लोन आणि इतर प्रकारचे रिटेल लोन घेणारे ग्राहकही याचा फायदा घेत आहेत. यासाठी कर्जदार आपले कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करून घेत आहेत.

स्वस्त कर्जाचा फायदा घेण्यासाठी ग्राहक इतर बँकांकडे धाव घेत असल्याचे अनेक बड्या बँकांच्या प्रमुखांचे म्हणणे आहे. मायनिंग सेक्टर मधील प्रमुख वेदांता ने 31 जानेवारी रोजी सांगितले होते की,” ते आपले 8,000 कोटी रुपयांचे लोन युनियन बँक ऑफ इंडियाकडे ट्रान्सफर करू इच्छित आहे.” कंपनीने 2020 मध्ये SBIच्या नेतृत्वाखालील बँकेच्या ग्रुपकडून 10.5 टक्के व्याजदराने 10 हजार कोटींचे लोन घेतले होते. कंपनी ट्रान्सफर करून व्याजदर 2 टक्क्यांनी कमी करू शकते.

मजबूत बॅलन्सशीट असलेले कर्जदारही स्वस्त कर्जाच्या शोधात आहेत
PNB, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की,’ पुरेशी तरलता आणि मजबूत बॅलन्सशीट असलेले कॉर्पोरेट कर्जदार बँकांवर व्याज कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत आणि बँकांमधील स्पर्धा वाढल्यामुळे दर देखील कमी होत आहेत.” बँक ऑफ बडोदाचे मुख्य कार्यकारी संजीव चढ्ढा म्हणतात की,”व्याजदर कपातीचे चक्र सुरू झाल्यापासून ग्राहक सतत बँका बदलत आहेत.”

होम लोनचे ग्राहकही बँका बदलत आहेत
बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक स्वरूप दासगुप्ता सांगतात की,”होम लोन सुरक्षित असल्यामुळे ग्राहक बँकांवर व्याजदर कमी करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणत आहेत. अनेक बँका आपले खेळते भांडवल नवीन कर्ज वाटप करण्यासाठी वापरू शकत नाहीत. SBI चे स्वतःचे खेळते भांडवल 2.06 लाख कोटी आहे, त्यापैकी 1.99 लाख कोटी वापरले जात नाहीत.”

येत्या तिमाहीत गोष्टी सुधारतील
पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) मुख्य कार्यकारी एसएस मल्लिकार्जुन राव म्हणतात की.” येत्या तिमाहीत रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते. तरच कर्ज ट्रान्सफरच्या त्रासातून सुटका होईल. सध्या स्वस्त कर्जाच्या लालसेपोटी ग्राहक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करत आहेत. अशा स्थितीत काही बँकांना ग्राहकांना रोखण्यासाठी व्याजदर स्वस्त करावे लागले आहेत.”

Leave a Comment