मुंबई । देशात सायबर क्राईम च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अश्यातच ‘जोकर’ या नावाचे अँप बाजारात आले आहे. या अँप बाबत सर्वानी सावध राहायला हवे. सर्वाना सावधानतेचा इशारा सायबर क्राईम कडून देण्यात आला आहे. जोकर या नावातच हास्य आहे. हे नाव ऐकलं की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. पण, हाच जोकर सर्वाना रडवण्याचं काम करत आहे.
जोकर नावाचं हे अँप बनवण्यात आलं आहे आणि त्याच्या सहाय्याने तुमच्या मोबाइल मधील अँड्रॉईड अँप वर हल्ला करत असून तुमच्या बँक खात्याची माहिती चोरत आहे. सोबतचं तुमचा खाजगी डेटासुद्धा चोरत आहे. सायबर विभागामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आणि योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लाहि देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी १४० अंकाने सुरुवात होणाऱ्या नंबर वरून फोन आल्यास न उचलण्याबाबत माहिती दिली होती.
सायबर फ्रॉड करणारे दिवसेंदिवस दोन पावले पुढे जाऊन सायबर क्राइम करत आहेत.वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. सायबर क्राईम हे जोकर नावाचा अँप तयार करून त्याच्या साहाय्याने माहिती गोळा करू पाहत आहे. तुमच्या नकळत तुमचा डेटा आणि तुमचा बँक अकाउंट बद्दल माहिती हॅकर जवळ सहज पोचू शकतो याची कोणाला भनक सुद्धा लागणार नाही. यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच ॲप डाऊनलोड करताना एकदा तपासून घ्या आणि अनोळखी नंबरद्वारे आलेला मेसेज किंवा लिंक आणि मेलवर क्लिक करू नका, असा सल्ला सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांनी दिला आहे.
हे पण वाचा –
आता घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय ‘ही’ बँक देणार अवघ्या काही मिनिटांत लोन, जाणून घ्या
अलार्मच्या रिंगवर वेगवेगळ्या प्रकारे डान्स करतो ‘हा’ पक्षी, पहा व्हिडिओ
आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या
ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या