हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दादर म्हणलं की डोळ्यासमोर येते ती प्रचंड लोकांच्या गर्दीने भरलेला प्लॅटफॉर्म. मुंबई मधील सर्वाधिक गर्दी असणारे स्थानक म्हणजे दादर आहे. येथे पूर्व – पश्चिम रेल्वे स्थानक असल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाश्यांचा गोंधळही उडतो. म्ह्णून येथील फलाट क्रमांक बदलण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत्या. आता काल म्हणजेच 9 डिसेंबर दादर रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक बदलले गेले आहेत.
कसा आहे बदल?
दादर स्थानकाच्या पूर्वीचा फलाट क्रमांक 1 ते 7 चे रूपांतर आता 8 ते 14 असे करण्यात आले आहे. या स्थानकावर पश्चिम व मध्य रेल्वेचे एकूण 14 फलाट आहेत. आज प्लॅटफॉर्म क्रमांक एकमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र पश्चिम प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅटफॉर्मचे क्रमांक जशास तसे राहणार आहेत.
कसे असतील हे क्रमांक?
बदल करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मनुसार आता दादर स्थानकावर प. रेल्वेचे 1 ते 7 क्रमांकावरील फलाट क्रमांक जसे आहेत तसेच राहणार आहेत. तर मध्य रेल्वेचा फलाट क्रमांक 1 हा आता 8 असणार आहे. जो 3 प्लॅटफॉर्म होता तो आता 9 क्रमांकाचा फलाट असणार आहे. तर जो प्लॅटफॉर्म 4 होता तो आता 10 क्रमांकाचा फलाट आहे. 5 क्रमांकाचा प्लॅटफॉर्म हा आता 11 क्रमांकाचा फलाट आहे. 6 प्लॅटफॉर्म हा आता 12 क्रमांकाचा फलाट आहे. 7 व्हा क्रमांकाचा फलाट हा आता 13 क्रमांकाचा फलाट आहे. तर 8 व्हा क्रमांकाचा प्लॅटफॉर्म हा आता 14 वा क्रमांकाचा फलाट आहे. असे बदल करण्यात आले आहेत.
प्रवाश्यांना समजण्यासाठी लावले आहेत डिस्प्ले बोर्ड –
दादर स्थानकातील यां सर्वात मोठ्या बदलामुळे प्रवाश्यांना आपल्या स्थानकाची ओळख व्हावी यासाठी डिस्प्ले बोर्ड महत्वाच्या ठिकाणी लावले गेले आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या भागात मध्य रेल्वेच्या फलाटांच्या बोर्डांची सूचना दिली आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे प्रवाश्यांची होणारी तारांबळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दादर हे मोठे स्टेशन असल्यामुळे तेथे पश्चिम रेल्वेच्या रोज 1050 गाड्या तर मध्य रेल्वेच्या 900 गाड्या थांबतात. त्यामुळे येथे प्रवाश्यांची संख्याही जास्त आहे.