हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली असून येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे.
नागपूर अधिवेशनाची विरोधकांकडून खूप वाट पाहिली जात होती. कारण अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सरकारला घेण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. तर, दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामकाज असणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याने राज्यभरात वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलने करणं करण्यात आल्यानंतरही अद्याप केंद्राकडून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन देखील विरोधक सत्तापक्षाला घेरण्याची शक्यता आहे.