बळजबरी करण्याऱ्या बापाची मुलीनेच केली हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलांची मुलीने लाकडी दांड्याने वार करून हत्या केली आहे. सावत्र वडील सारखे तिच्यावर बळजबरी करत होते. यामुळे पीडित मुलीने या सर्व त्रासाला कंटाळून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृताची पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर दामाजी गडकर असे आहे. ते ६० वर्षांचे होते. पंधरा वर्षांपूर्वी पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर मृत ज्ञानेश्वर याने वंदना नावाच्या एका विवाहित महिलेशी दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या वेळी वंदनाला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. लग्नानंतर ज्ञानेश्वर सावळी बीबी याठिकाणी वंदनासोबत राहत होता. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील खापरी याठिकाणी राहायला गेला. अधून मधून सावळी बीबी याठिकाणी तो आपली पत्नी वंदनाला भेटायला येत होता.

भेटायला आल्यानंतर तो वंदनाला आणि सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला त्यावेळी त्याने दारूच्या नशेत 17 वर्षीय सावत्र मुलीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. यावेळी वंदना देखील तिथेच होती. तो पत्नीलादेखील आवरत नसल्याचे पाहून मुलीने जवळ पडलेल्या लाकडी दांड्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर वार केला. यामुळे ज्ञानेश्वर बेशुद्ध पडला. त्या दरम्यान रक्तप्रवाह जास्त झाल्याने ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment