मसूद अझहरवरील कारवाई नंतर घाबरला दाऊद इब्राहिम, कुटुंबीयांना पाकिस्तानबाहेर पाठविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । पाकिस्तान (Pakistan) वरील फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या वाढत्या दबावामुळे इम्रान खानला (Imran Khan) दहशतवादी नेटवर्क आणि टेरर फंडिंग (Terror Funding) विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले गेले आहे. पाकिस्तान सरकारने जैश चीफ मसूद अझहर आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकी-उर-रहमान लखवी यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) देखील घाबरला आहे. पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या वाढत्या कारवाई नंतर दाऊदने आपल्या कुटुंबातील खास सदस्यांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून दाऊदचा मुलगा आणि दोन धाकट्या भावाच्या मुलांना पाकिस्तानच्या बाहेर पाठविण्यात आले आहे.

वृत्तसंस्था IANS च्या वृत्तानुसार, दाऊदचा धाकटा भाऊ मुस्तकीम अली कासकर यापूर्वीच दुबईमध्ये स्थायिक झाला आहे. तो संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कतारमधील डी कंपनीचा कायदेशीर व्यवसाय पाहतो. मुस्ताकिम याचा संयुक्त अरब अमिरातीमध्ये कपड्यांचा कारखाना आहे. अलीकडेच कराचीहून दुबई येथे हलविण्यात आलेल्या डी कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांची देखरेख करतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, कराचीमधील डिफेन्स हाऊसिंग एरियामध्ये राहतो, गेल्या दोन आठवड्यांपासून त्याची देखील काहीही माहिती आलेली नाही. दाऊदचा खास असलेला आणि वसूली सांभाळणारा छोटा शकीलही गेले काही दिवस कुठेतरी लपून बसला आहे. दाऊदने यापूर्वीच आपली मोठी मुलगी महारुखसाठी पोर्तुगीज पासपोर्टची व्यवस्था केली होती. महरुखने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैदसोबत लग्न केले आहे. दाऊद सध्या कराची येथून आपला व्यवसाय चालवित आहे. त्याच प्रकारे, त्याचे आणखीही बरेच व्ययसाय आहेत.

दाऊदच्या भावाच्या मुलांनाही पाठवले
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अनीस इब्राहिमने डी-कंपनीचा व्यवसाय पाहण्यासाठी आपल्या मुलांना आधीच मिडल ईस्टच्या देशांत हलवले होते. सध्या तो सिंध प्रांताच्या कोटली इंडस्ट्रियल एरियामध्ये मेहरान पेपर मिलचे काम पाहतो. ही गिरणी कराचीपासून 154 कि.मी. अंतरावर आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) अंतर्गत ही पेपर मिलवर बनावट भारतीय चलन छापल्याचा आरोप आहे. यापूर्वी अमेरिकन एजन्सी डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी ऑफिस फॉरेन अ‍ॅसेटस कंट्रोलने पाकिस्तान सरकारला ही पेपर मिल बंद करण्यास सांगितले होते.

दाऊदचा भाऊ नूरुल हक याचा नुकताच पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. त्याचा मोठा भाऊ साबिर अहमद याला 1981 मध्ये मुंबईत गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. नंतर साबिरचे कुटुंब पाकिस्तानमध्ये गेले आणि दाऊदच्या देखरेखीखाली राहत आहेत. याशिवाय डॉनचा मुलगा मोईन कासकर बर्‍याचदा लंडनला येतो. त्याचेही लग्न ब्रिटनमधील सुप्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीशी झाले आहे. 2019 पर्यंत तो आपल्या पत्नीसमवेत कराची येथील दाऊदच्या क्लिफ्टन बंगल्यात थांबला होता. मोईन कराची, लाहोर आणि युएई मधील डी-कंपनीचा अब्जावधी डॉलर्सचा रिअल इस्टेट व्यवसाय संभाळतो.

FATF च्या दबावाखाली इम्रान सरकार
विशेष म्हणजे, फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या दबावाखाली पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रमुख मौलाना मसूद अझहर यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केले होते. जैश-ए-च्या नेत्यांवरची ही कारवाई पाहून सर्वांचे लक्ष आता दाऊद इब्राहिमकडे लागले आहे.

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लखवीला अटक झाल्यानंतरही डी-कंपनीला चिंता वाटत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, दाऊदचे निकटवर्तीय असलेले जावेद मियांदाद यांचे जुने सहकारी असलेले पंतप्रधान इम्रान खान खचितच दाऊदवर काही कारवाई करू शकतील. यापूर्वीही जेव्हा त्याची सिंडीकेट जगातील एजन्सींच्या रडारवर आली होती, तेव्हा डी-कंपनी आपल्या खास सदस्यांना पाकिस्तानबाहेर पाठवले गेले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment