संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; सिद्धू मूसेवाला प्रमाणे मारू

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून संजय राऊतांना धमकीचा मेसेज आला असून यामध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्याप्रमाणे तुमची हत्या करू असं म्हंटल आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकींनंतर संजय राऊत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोईकडून यापूर्वी अभिनेता सलमान खान यालाही धमकी देण्यात आली होती. आता संजय राऊत यांना मेसेजकरून धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यांनतर AK 47  ने मारू, असं या धमकीच्या मेसेज मध्ये म्हंटल आहे. सिद्धू मुसेवाला याना जस मारलं तसेच मारू अशी धमकी देण्यात आली. तसेच सलमान खानचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.राऊतांना मिळलेल्या धमकीनंतर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून अधिक तपास करत आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांना Y + सुरक्षा होती मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राऊतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. माझ्या जीवाला धोका असल्याचे पत्र संजय राऊत यांनी यापूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना दिले होते. मात्र त्यांनंतरही त्यांच्या सुरक्षेत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती . त्यामुळे आता या धमकींनंतर तरी सरकार कडून राऊतांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय.