हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे सांगत नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. परंतु अखेर पोलिसांनी आपल्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून या अज्ञात व्यक्तीचा अवघ्या काही तासातच त्याला अटक केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून एक फोन कॉल आला होता. या फोनवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने धमकी दिली की, मी कुख्ख्यात गुंड दाऊड इब्राहिमचा माणूस आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ. या फोन कॉलमुळे काही वेळासाठी मुंबई पोलीस दलात खळबळ माजली होती. तसेच, समोरील व्यक्ती स्वतःला दाऊड इब्राहिमचा माणूस असल्याचे सांगत असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने यांनी घेतले होते.
परंतु ज्यावेळी पोलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास केला त्यावेळी त्यांना समजले की हा एक फेक कॉल आहे. हा कॉल चुनाभट्टी परिसरातून एका 29 वर्षीय तरुणाने केला होता. ज्याला पोलिसांनी तातडीने अटक केली. परंतु सध्या पोलीस या गोष्टीचा तपास करीत आहेत की हा कॉल आरोपीने कोणत्या उद्देशाने केला होता. कारण की, याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.