हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. अग्निपथ योजनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी थेट ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. “2024 निवडणुकी अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे. अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले झाले तरी निवडणुक महत्वाची आहे, अशी टीका सय्यद यांनी केली आहे.
दीपाली सय्यद यांनी आज ट्विट की असून त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “2024 निवडणुकी आगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भिती भाजपाला आहे.अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणुक महत्वाची हे मोदीजींचे धोरण चुकीचे आहे.”
२०२४ निवडणुकी आगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भिती भाजपाला आहे.अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणुक महत्वाची हे मोदीजींचे धोरण चुकीचे आहे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 18, 2022
दरम्यान, केंद्र सरकारच्या योजनेच्या घोषणेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशभरात तरुणांकडून रस्त्यावर उतरत रेल्वे स्टेशन फोडण्यात आले, रेल्वे गाड्याही जाळण्यात आल्या आहेत. तसेच अग्निपथ योजनेला महाराष्ट्रातूनही विरोध पाहायला मिळत आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे.