हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांत एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेतले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले आहे.
सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “येत्या दोन दिवसात आदरणीय उध्दवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उध्दवसाहेबांनी कुटूंब प्रमुखांची भुमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल.”
@OfficeofUT
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
दीपाली सय्यद यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार का? आणि या भेटीनंतर नेमकं काय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी देखील सय्यद यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये “मला एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील,” असे म्हंटले होते.