Friday, June 9, 2023

‘ऑस्कर 2023’मध्ये दीपिका पादुकोणवर मोठी जबाबदारी; केली ‘ही’ पोस्ट शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘पठाण’ या सिनेमामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आहे. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाचा आता ‘ऑस्कर 2023’च्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचाही समावेश आहे. ‘ऑस्कर 2023’च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसोबत आणेल दिग्गज सेलिब्रिटी असणार आहेत. त्यामध्ये ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

यापूर्वीही दीपिकाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच फीफा वर्ल्ड कपमध्ये दीपिकाने ट्रॉफीचे अनावरण केले होते. दीपिकाचे आज जगभरात मोठ्या संख्येने चाहते आहेत.