माझ्यावरील 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा, उगाच दिशाभूल करू नका; अजित पवारांचे सडेतोड उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वर साखर कारखान्यासह इतर कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. त्यानुसार पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विक्री झालेल्या कारखान्यांची यादीच सादर केली. तसेच साखर कारखान्यांच्या विक्रीत कोणी 25 हजार कोटींचा घोटाळा तर कोणी 10 हजार कोटींचा घोटाळा झाला, असल्याचे म्हणत आहे. हा आरोप खोटा असून खोटी आकडेवारी सादर करुन दिशाभूल करू नये, असा इशारा पवार यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे कोरोना विषयाबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर कारखाना घोटाळ्याचे करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडलेली आहे. अनेक साखर कारखान्यांची सरकारी यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील 65 कारखाने हे दुसऱ्या कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत अथवा ते विकण्यात आले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन केल्या आरोपांवर यावेळी अजित पवार म्हणाले की, जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत. मात्र, काहींकडून या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जरंडेश्वर कारखाना सर्वप्रथम मुंबईस्थित गुरु कम्युनिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाच्या हणमंत गायकवाड यांनी विकत घेतला होता. त्यासाठी हणमंत गायकवाड यांनी जरंडेश्वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, या कारखान्यात त्यांना तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसऱ्या कंपनीला विकून टाकल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment