मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘के न्यूज इस्लामपूर’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या इच्छाला माझा पाठिंबा आहे, असं ‘बोलकं’ उत्तर अजित पवार यांनी दिलं. (DCm Ajit Pawar on jayant patil Over Cm Statement)
गेली 25 ते 30 वर्ष मी राजकारणात काम करतोय. माझं मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं महत्त्वाचं आणि मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं. पाटलांच्या याच विधानावर अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो”.
जयंत पाटील यांनी एका चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रकारचे राजकीय प्रश्न विचारण्यात आले. मुख्यमंत्रिपदाविषयी विचारल्यानंतर त्यांनी त्यांचं अनेक वर्षांपासून असलेलं स्वप्न महाराष्ट्रासमोर जाहीरपणाने मांडलं.जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही. यावर तुमची इच्छा आहे का, असा सवाल जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नावर मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटणारच. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
तसेच मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल. परंतु सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी, लागेल. पक्ष संघटना मजबूत करावं लागेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’