ओबीसी आरक्षणावरून भुजबळ- फडणवीसांमध्ये जोरदार कलगीतुरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा दिवस आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, असे आवाहन केले. हाच मुद्दा धरत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली.

भुजबळ म्हणाले, फडणवीस हे ओबीसींच्या पाठीमागे उभे आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही. एकमेकांमध्ये दुरी निर्माण करण्याऐवजी, भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि हा विषय सोडवू. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं माझ्याकडे आहे. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे

त्यावरून फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर देत म्हंटल की, ओबीसी आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही बैठकीला येतो. परंतु बैठकीत जे ठरवलं जातं ते पुढे का जात नाही? वैयक्तिक तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु मंत्री म्हणून तुम्हाला सरकारचा पाठिंबा आहे का? सरकार ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतंय का? असा सवाल फडणवीसांनी भुजबळ यांना केला. ओबीसी आरक्षणावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. ओबीसी आरक्षणाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला ही जबाबदारी राज्य सरकारला घ्यावीच लागेल. असे फडणवीसांनी म्हंटल.

दरम्यान, 2010 मध्ये ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सुरुवात झाली. 2016 मध्ये हा डेटा समोर आला. परंतु केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना गेली ७ वर्ष तुम्ही गप्प का? असा पलटवार भुजबळ यांनी केला. ओबीसी आरक्षणाबाबत भाजपा राजकारण करत आहे. ही चुकीची गोष्ट आहे. युपीए सरकारने तयार केलेला डेटा तुम्ही पुढे का आणला नाही? निवडणुका आल्यानंतर यावर राजकारण केले जात आहे. असे ते म्हणाले.

Leave a Comment