दरड आणि पूरग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; फडणवीसांची राज्य सरकारला मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोकण, प. महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत! अस फडणवीसांनी म्हंटल.

परंतू कोकण,पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात.असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे.

इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे.

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे! अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.