विशेष प्रतिनिधी । निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रतिज्ञापत्र नोंदवणाऱ्या (नोटराइज्ड करणाऱ्या) वकिलाच्या सेवेचा कालावधी २०१८ सालच्या डिसेंबर महिन्यातच पूर्ण झाला असून २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात सादर केल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्राला संपलेल्या तारखेचा शिक्का मारण्यात आला आहे. संपलेल्या तारखेचा शिक्का ग्राह्य धरायचा का हा प्रश्न निवडणूक आयोगापुढे असणार आहे.
व्ही.पी.सोनटक्के असं मुदत संपलेल्या आणि तरीही नोटरी केलेल्या वकिलांचे नाव असून, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ही चूक कशी घडली याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान प्रतिज्ञापत्रातील उर्वरित माहिती बरोबर असल्यास ७ तारखेपर्यंत नोटरी केलेलं नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुभा देवेंद्र फडणवीस यांना मिळेल असं सांगण्यात येत आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या-
राजकारणात बी लय स्कोप आहे राव.. !! सविस्तर वाचल्याशिवाय समजणारच नाय बगा..@BJP4Maharashtra @ShivSena @NCPspeaks @IYCMaha @satyajeettambehttps://t.co/sFWqzx5xQF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019
कराड उत्तरमध्ये सेना-भाजप एकमेकांविरुद्ध लढून राष्ट्रवादीला मदत करणार का? @NCPspeaks @ShivSena @BJP4Maharashtra https://t.co/yp2L9hkD8a
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019
एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र ठाकूरांची मागणी
https://t.co/mWxa1sI39T— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019
Nahi dyaychi mubha yala yane nagpur ch nav kharab Kel